Search This Blog

Sunday, September 13, 2009

मन उधाण वाऱ्याचे ................

मायेच्या हळव्या स्पर्षाने खुलते..
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते...
मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे..
का होते बेभान कसे गहिवरते...

आकाशी स्वप्न्याच्या हरपून भान शिरते
हुरहुरत्या संध्येला कधी एकटेच झुलते
सावरते बावरते झडते अडखडते का पडते
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन् क्षणात फिरुनी आभाळाला भिडते...
मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे...
का होते बेभान कसे गहिवरते...

रुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते
कधी गहिऱ्या डोळांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे पापणे नकळत का भरकटते
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते
भाबडे तरी भासांच्या मागुनी पडते..
मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे..
का होते बेभान कसे गहिवरते...

मन उधाण वाऱ्याचे ................

:)

No comments: